तीन मिनिटे आधी जेवल्याने कर्मचाऱ्याचा पगार कापला

85

सामना ऑनलाईन, टोकियो

नोकरी करत असतान वरिष्ठांच्या खाव्या लागणाऱ्या शिव्या, मिळणारे मेमो त्यातून होणारी त्यांची चिडचिड ही नित्याची गोष्ट झाली आहे. मात्र जपानमध्ये एका कर्मचाऱ्यासोबत वरिष्ठांनी भयंकर अन्याय केला आहे. जबरदस्त भूक लागली म्हणून हा कर्मचारी ठरलेल्या वेळेच्या तीन मिनिटे आधी जेवायला गेला. इतक्या शुल्लक कारणासाठी या कर्मचाऱ्याचा पगार कापण्यात आला आणि वरिष्ठांच्या शिव्याही खाव्या लागल्या.

आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था एएफपीने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलंय की हा कर्मचारी १ वाजता जेवायला जाण्याऐवजी त्याच्या थोडं आधी जेवायला गेला. यामुळे त्याचा अर्ध्या दिवसाचा पगार कापण्यात आला. हा कर्मचारी वॉटरवर्क ब्युरोमध्ये कामाला आहे. ६४ वर्षांचा हा कर्मचारी सात महिन्यात २६ वेळा वेळेआधी जेवायला गेल्याने ही कारवाई केल्याचं ब्युरोतर्फे सांगण्यात आलं. हे वृत्त जपानमध्ये वाऱ्यासारखं पसरल्यानंतर या कंपनीवर टीका व्हायला लागली. या टीकेमुळे कंपनीने नमतं घेत घडल्या प्रकाराबद्दल कर्मचाऱ्याची माफी मागितली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या