पालिका शाळांतील विद्यार्थी रोखणार कोरोनाचा धोका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो - संदीप पगडे

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. भविष्यात शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थी, शिक्षक व इतर कर्मचाऱयांचा एकमेकांशी आलेल्या संपर्कामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी वर्पिंग मॉडेल स्पूल सोल्युशन तयार केले आहे. याद्वारे शाळेच्या प्रवेशद्वारावरच ऑटोमेटेड थर्मल स्क्रिनिंग आणि अटेंडन्स रेकॉर्डिंग सिस्टम बसविण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश देण्यासाठी आरएफआयडी आधारित युनिक आयडेंटिफिकेशन देण्यात येईल. याद्वारे दररोज विद्यार्थ्यांच्या तापमानाची तपासणी होईल. याचा दुहेरी लाभ म्हणजे शाळेत हजेरीपुस्तकात हजेरी घेण्याची गरजही भासणार नाही.

कोरोना व्हायरस एखाद्या पृष्ठभागावर बराच काळ राहू शकतो. त्यामुळे शाळेच्या कोणत्याही पृष्ठभागाशी विद्यार्थी-शिक्षकांचा कमीत कमी संपर्क येईल यावर भर दिला जाणार आहे. क्लासरूम इलेक्ट्रिकल सिस्टम ऑटोमेशनच्या माध्यमातून वर्गातील शिक्षक किवा मॉनिटरच्या मोबाईल पह्नद्वारे वर्गातील इलेक्ट्रिक उपकरणांचे स्वीच बंद करता येणार आहेत. सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या शाळेतील काwशल्य प्रशिक्षण आणि अॅडव्हान्स ऑनलाइन स्किल ट्रेनिंग प्रोग्रॅममधील विद्यार्थ्यांनी निर्माण केलेला हा नावीन्यपूर्ण उपक्रम किफायतशीर व मापनीय तंत्रज्ञान सोल्यूशन्सच्या अंमलबजावणीच्या माध्यमातून शाळांसाठी तयार करण्यात आले आहेत.

सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या सहकार्याने थर्मल स्क्रिनिंग आणि अटेंडन्स रेकाॉर्डिंग सिस्टमबरोबरच क्लासरूम इलेक्ट्रिकल सिस्टम ऑटोमेशन, वॉटर पूलर व वॉशरूम वॉटर डिस्पेन्सिंग ऑटोमेशन आणि संपूर्ण शाळेतील महत्त्वाच्या ठिकाणी सेन्सरवर आधारित हॅण्ड सॅनिटायझर डिस्पेन्सिंग सोल्युशन बसविण्यात येणार आहे.