मानसिक आरोग्यावरील कार्यशाळेचे उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते मानसिक आरोग्यावरील कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड यांच्या पुढाकारातून मानसिक आरोग्य सेवा क्षेत्रात कार्यरत ‘एमपॉवर’ संस्थेच्या वतीने मॉडेल कॉलेज, घनसांगवी- जालना येथे या कार्यशाळेचे आयोजन केले होते.

मानसिक आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी सर्वांगीण आणि बहुशाखीय दृष्टिकोनातून जनजागृती, मार्गदर्शन व सल्ला देण्याचा प्रयत्न या कार्यशाळेतून केला गेला. या कार्यशाळेत डॉ. रिचा अरुण शेटे आणि डॉ. अविनाश गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. अंबड आणि घनसांगवी येथील 200पेक्षा अधिक आशा वर्कर्स आणि 50पेक्षा अधिक कम्युनिटी हेल्थ ऑफिसर्सनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.

मानसिक आरोग्य आणि ते आपल्या शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे कसे आहे, याबाबत उपस्थितांना डॉ. शेटे यांनी जाणीव करून दिली. राजेश टोपे यांनी ‘एम्पॉवर’च्या कार्याचे कौतुक केले.