
यजमान संघच जगज्जेता होतो हे गेल्या तिन्ही स्पर्धांत दिसून आलेय. सलग चौथ्यांदाही तो योगायोग जुळून येईल, असा अंदाज आहे. तसे सध्या खेळत असलेल्या संघांमध्ये सर्वात बलाढय़ आणि संतुलित संघ म्हणजे टीम इंडिया. त्यामुळे यावेळी ‘जीतेगा भाई जीतेगा, इंडिया जीतेगा’ हेच वाक्य प्रत्येक दिग्गज खेळाडूच्या मुखी आहे आणि सर्वांनीच एकमुखाने म्हटलेय की टीम इंडिया अंतिम फेरी गाठणार.
क्रिकेटचे महायुद्ध सुरू व्हायला अवघे शेवटचे तीन दिवस उरलेत. दहाचे दहा संघ आपापले सराव सामने खेळण्यात व्यस्त आहेत. जगभरातील माजी जगज्जेत्या संघातील अनेक दिग्गजांचेही हिंदुस्थानात आगमन झालेय. आलेल्या सर्वांच्या मुखी एकच वाक्य आहे की, अंतिम सामन्यात कोण असो किंवा नसो, टीम इंडिया नक्कीच असेल. अंतिम फेरीत खेळणारा दुसरा संघ म्हणून काहींना जगज्जेता इंग्लंड वाटतोय. काहींनी पाकिस्तान अंतिम फेरी गाठणार, असा अंदाज व्यक्त केला आहे.
कोण गाठणार फायनल? दिग्गजांची भविष्यवाणी
जॅक कॅलिस ः हिंदुस्थान वि. इंग्लंड
ख्रिस गेल ः हिंदुस्थान वि. पाकिस्तान
शेट वॉटसन ः हिंदुस्थान वि. ऑस्ट्रेलिया
दिनेश कार्तिक ः हिंदुस्थान वि. पाकिस्तान
फॅफ डयुप्लेसिस ः हिंदुस्थान वि. ऑस्ट्रेलिया
वकार युनूस ः हिंदुस्थान वि. इंग्लंड
डेल स्टेन ः हिंदुस्थान वि. इंग्लंड
इरफान पठाण ः हिंदुस्थान वि. द.आफ्रिका
मुरली विजय ः हिंदुस्थान वि. पाकिस्तान
संजय मांजरेकर ः हिंदुस्थान वि. ऑस्ट्रेलिया
पीयूष चावला ः हिंदुस्थान वि. इंग्लंड
एरॉन फिंच ः ऑस्ट्रेलिया वि. द. आफ्रिका

























































