वर्ल्ड कपमधला पराभव जिव्हारी लागला, डिव्हिलीयर्सने सांगितले निवृत्तीचे कारण

538

ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये 2015 सालातील वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले होते. या वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत यजमान न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला हरवत अंतिम फेरीचे तिकीट बुक केले. हा पराभव जिव्हारी लागल्यामुळे मी निवृत्तीकडे वळलो, अशी कबुली दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू ए बी डिव्हिलीयर्स याने गुरूवारी दिली.

वर्ल्ड कपमधील पराभवानंतर पुढील 12 महिने माझ्यासाठी खडतर गेले. या कालावधीत एकांतवासात राहिलो. खरेतर या दरम्यान माझ्या मनातील भावना कोच, व्यवस्थापन, मित्र यांच्यासोबत शेअर करायला हव्या होत्या. पण ते मी केले नाही. येथूच चूक झाली. अखेर निवृत्तीचा मार्ग पत्करला, अशी खंत ए बी डिव्हिलीयर्स याने यावेळी व्यक्त केली.

आयपीएलचे कर्णधारपद धोनीकडेच
ए बी डिव्हिलीयर्स याने आयपीएलमधला सर्वोत्तम संघ यावेळी निवडला असून याचे कर्णधारपद महेंद्रसिंग धोनीकडे त्याने सोपवले आहे. ए बी डिव्हिलीयर्सकडून निवडण्यात आलेल्या संघामध्ये महेंद्रसिंग धोनीसह वीरेंद्र सेहवाग, रोहीत शर्मा, विराट कोहली, केन विल्यमसन/स्टीवन स्मिथ/ए बी डिव्हिलीयर्स, बेन स्टोक्स, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रवींद्र जाडेदा, राशीद खान, भुवनेश्वरपुमार, कॉगिसो रबाडा, जसप्रीत बुमराह या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या