
जिओ स्टुडिओजचा पहिला मराठी चित्रपट ‘मी वसंतराव’ आता डिजिटल माध्यमावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या वर्षी अनेक फिल्म महोत्सव तसेच सिनेमागृहांत प्रदर्शित होताच देशभरातून समीक्षकांची दाद मिळालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. एवढेच नव्हे तर प्रेक्षक ओटीटीवर हा सिनेमा कधी बघायला मिळेल याची आतुरतेने वाट पाहत होते आणि आता त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. जिओ सिनेमावर 21 मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. दोन राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर ही उत्सुकता निर्माण केली होती. 95 व्या ऑस्करसाठी जगभरातील 301 चित्रपटांची रिमांइंडर लिस्ट जाहीर केली होती, यांमध्ये ‘मी वसंतराव’चा समावेश होता. ‘मी वसंतराव’पासून जिओ सिनेमावर मराठी चित्रपटांच्या डिजिटल वर्ल्ड प्रीमियरची सुरुवात होणार आहे.



























































