प्रकृतीनुसार ठरवा आहार… वाचा सविस्तर

2741

युनायटेड नेशन्स फूड अँड अॅग्रिकल्चर (एफएक्यू) ही संघटना दरवर्षी 16 ऑक्टोबरला ‘जागतिक आहार दिवस’ पाळण्यात येतो. कुपोषित आणि पोषक आहारापासून वंचित असणाऱ्यांसाठी अन्न सुरक्षितततेबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येतो. संघटनेकडून दरवर्षी घोषवाक्य ठरवण्यात येते. आपल्या प्रकृतीनुसार योग्य आहार जाणून घेण्यासाठी खवय्यांसाठीही हा दिवस महत्त्वाचा असतो. जागतिक आहारदिनी संतुलित आणि पौष्टिक आहाराबाबत जनजागृती करण्यात येते.

प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार योग्य आहार घेणे गरजेचे असते. वजन आणि उंचीनुसार शरीराचे तीन प्रकार असतात. त्यानुसार जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीत आवश्यक ते बदल करण्याची गरज असते. चिली पेपर शेप, पिअर शेप आणि अॅपल शेप असे शरीराचे तीन प्रकार आहेत. त्यामुसार प्रत्येकाने आहार घेण्याची गरज असते.

चिली शेप

chilli-shape

चिली शेपमध्ये सडपातळ शरीर असून खांदे आणि कंबर यांचा आकार सारखाच असतो. त्यामुळे अशा शरीराच्या व्यक्तींना वजन वाढवण्याची गरज असते. त्यासाठी त्यांनी योग्य तो पोषक आहार घेणे गरजेचे आवश्यक आहे. त्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेला आहार पुढाल प्रमाणे आहे. न्याहारीसाठी  दोन अंड्यांचे आम्लेट आणि  मशरूमचे काही काप, किसलेला मॉझरेला चीज आणि एक शिमला मिरची यांचे मिश्रण गव्हापासून बनवलेल्या पावासोबत खावा मात्र मैद्यापासून बनवलेला पाव टाळण्याची गरज आहे. तसेच जेवणात मनुके आणि बदामांचा सामावेश करावा. दुपारच्या जेवणात एक कप ब्लॅक बिन सूप व त्यासोबत पालकचे सॅलेड खावे त्यासोबत भाजी व एक चपातीचा समावेश करावा. रात्रीच्या जेवणात एक चमचा सोया सॉस व मधाचे मिश्रण माशाला लावून तो भाजून ब्राउन राईस व भाज्यांबरोबर खाणे. तसेच दही आणि पीच यांचा समावेश आहारात करावा.

पिअर शेप 

pear-shape

पिअर शेपमध्ये हात आणि खांदे बारीक असतात तर छाती, कंबर व मांड्या आणि पाठीच्या भागात जास्त मेद जमल्याने शरीर स्थूल दिसते. त्यामुळे अशा व्यक्तींनी वजन नियंत्रित करण्यासाठी स्निग्ध पदार्थाचा वापर कमी करावा. अशा व्यक्तींनी न्याहारीत ओट्सपासून बनवलेले पदार्थ घ्यावे, उपमा, केळी व संत्र्याचा रस सकाळी घ्यावा तसेच गव्हाचे चिप्सचा समावेश करावा.मात्र, बटाट्याचे चिप्स टाळावे. दुपारच्या जेवणात दोन सँडविच व त्यासोबत दही घ्यावे आणि जेवणात एका फळाचा समावेश करावा. रात्रीच्या जेवणात  4  भाजलेल्या चिकनच्या तुकड्यांसोबत एक कप उकळलेल्या हिरव्या भाज्यांचा समावेश करावाय त्यासोबत सॅलेड व एक चपाती खावी. मात्र, जंक फूड आणि तळलेले पदार्थ टाळावेत.

अॅपल शेप 

apple-shape

अॅपल शेपमध्ये रुंद खांदे आणि सडपातळ हात व पाय असतात, शरीरातील जास्त मेद कंबरेच्या भागात साचलेला असतो. अशा व्यक्तींनी न्याहारीत ब्रेड व अंडी घ्यावी त्यासोबत एक फळ घ्यावे. दुपारच्या जेवणात सॅलेड व  गव्हाचे चिप्स घ्यावे. रात्रीच्या जेवणात ऑलिव ऑइलमध्ये तयार केलेले  चिकन आणि बटाटे घ्यावे. तसेच दही व ब्लूबेरी यांचा समावेश आहारात करावा.

आपली प्रतिक्रिया द्या