
कोरोनाच्या लढाईत मास्कबद्दल जनजागृती करण्यासाठी उत्तरप्रदेशात 150 चौरस मीटरचा भलामोठा मास्क तयार करण्यात येत आहे. त्यासाठी 75 जिह्यांमधून दोन-दोन मीटर कापड खरेदी करण्यात आले आहे. एकप्रकारे हा विश्वविक्रमच होणार आहे.
मास्कसाठी खादी ग्रामोद्योग विभाग खादीचे कापड पुरवणार असून फॅशन डिझायनर मनीष त्रिपाठी मास्क तयार करणार आहे. ग्रामोद्योग विभाग आणि ओड्रा फाऊंडेशन संयुक्तरीत्या खादीचा विशाल मास्क तयार करत आहेत.


























































