
कधी माणसांच्या आयुष्यातील एक महत्त्वाच्या अंग बनलेली चिऊताई आज मात्र माणसावर रुसली आहे. घरात, अंगणात ऐकू येणारा चिवचीवाट आज दुर्मिळ झाला. अश्यात समाज माध्यमावर एक फोटो व्हायरल झाला. या फोटोने चिऊताई ची आठवण न कळत झाली. नाशिक येथील स्वामी समर्थ नगरात असलेले मनोज कापडे यांच्या मुलाचा हा फोटो. मुलाचा अगदी जवळ चिऊताई बसलेली दिसत आहे.
हजारो वर्ष मानवाच्या सहवासात असलेली चिऊताई आज मानवामुळेच संकटात आली आहे. मानवाला सुखसोयी देणारे विज्ञानच या इवल्याश्या जीवावर उठले आहे. दिवसेंदिवस चिमण्यांच्या कमी होणाऱ्या संख्येवर चिंता व्यक्त केली जात आहे. समाधानाची ही बाब की, आता अनेक लोक चिऊ ताईच्या संवर्धनासाठी संरक्षणासाठी पुढाकार घेत असल्याचे चित्र दिसत आहे. आज जागतिक चिमणी दिवस. या दिवशी समाज माध्यमात वायरल झालेल्या एका फोटोची फार चर्चा रंगली आहे. या फोटोमुळे विसर पडलेल्या चिऊताईचा चिवचीवाटाची आठवण करून देणारा ठरला.नाशिक येथील मनोज प्रल्हाद कापडे यांना पशु पक्ष्याचा फार लळा. त्यांनी हा फोटो सोशल मीडियावर टाकला आहे.