आता जन्मणारं मूल ही डिझाईन करून मिळेल, चीनमध्ये विज्ञानाचा चमत्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । हाँगकाँग

जन्माला येणारं मूल कसं असावं? याचे सर्वसाधारण उत्तर असते सुदृढ असावं. पण तेच मूल जन्मापूर्वीच हवे तसे डिझाईन करून मिळाले तर? चीनमधील संशोधकाने हा चमत्कार केला आहे. जीन्समध्येच (जनुक) विशिष्ठ एडीटींग (बदल) करून दोन जुळ्या मुलींना जन्म देण्यात आला आहे.

चीनमधील एका विद्यापीठातील प्राध्यापक ही. जियानकुई यांनी काही दिवसांपूर्वी एका व्हिडीओद्वारे आपल्या संशोधनाची माहिती जाहीर केली. दरम्यान, ज्या दाम्पत्यावर हा प्रयोग केला त्यांची ओळख जाहीर करण्यास जियानकुई यांनी नकार दिला आहे.

हे संशोधन अनैतिक आणि हानिकारक
– जीन्स अर्थात शरीरातील जनुकं यांना अनुवंशिकतावाहक म्हटले जाते. मधुमेहासारख्या आजारांचा या जीन्सशी महत्त्वपूर्ण संबंध आहे. तसेच शारीरिक आणि मानसिक पातळीवर होणारे बदल यामागे जीन्स असतात. त्यामुळे अनैसर्गिक पद्धतीने जीन्समध्ये बदल करून छेडछाड करणे घातक मानले जाते.
– अमेरिकेसह जगभरातील जनुकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हे संशोधन अनैतिक आणि हानीकारक म्हटले आहे.
– चीन सरकारच्या आरोग्य विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत.