रोल्स रॉयसने लॉन्च केली जगातील सर्वात महागडी कार, किंमत वाचून व्हाल हैराण…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कार उत्पादक कंपनी रोल्स रॉयस आपल्या महागड्या कारच्या किंमतींमुळे जगात प्रसिद्ध आहे. मात्र आता कंपनीने जी कार लॉन्च केली आहे, ती जगातील सर्वात महाग कार आहे. या कारचे नाव Boat-Tail असं आहे. आतापर्यंत स्वीप टेल ही कंपनीची सर्वात महाग कार होती. आज आपण Boat-Tail या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

रोल्स रॉयस 4-सीट कन्व्हर्टेबल लक्झरी कारमध्ये स्वित्झर्लंडची प्रसिद्ध कंपनी हाऊस ऑफ बोएट कारच्या मालकासाठी (पती आणि पत्नी) खास घड्याळे देखील दिली आहेत. या व्यतिरिक्त या कारचे एक खास फिचर म्हणजे याची हलकी आणि पातळ स्टीयरिंग व्हील. या कारमध्ये शॅम्पेनसाठी एक वेगेळे कूलर देण्यात आले आहे. हे डबल शैम्पेन कूलर विशेषतः कार मालकाची आवडती आर्मान्ड डी ब्रिनाकच्या बाटल्या बसविण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

ac

जगातील सर्वात महागड्या या कारचे 3 मॉडेल्स लाँच केले जाणार आहे. यापैकी एक कार संगीत क्षेत्रातील एका व्यक्तीने आणि त्याच्या पत्नीने खरेदी केली आहे. असं असलं तर खरीदारचे नाव कंपनीने अद्याप जाहीर केलेले नाही. रोल्स रॉयसची बोट टेल कार 19 फूट लांब आहे. याचे अ‍ॅल्युमिनियम स्पेसफ्रेम प्लॅटफॉर्म फॅंटम, कलिनन आणि नवीन घोस्ट मॉडेल्समध्ये देखील पाहिले जाऊ शकते. यात कंपनीने 6.75-लिटर व्ही -12 इंजिन दिले आहे. कंपनीने या कारची किंमत 20 मिलियन पौंड म्हणजेच 200 कोटी रुपये इतकी आहे.

sca