
नखांचे सौंदर्य वाढवणारी नेलपॉलिश साधारण किती रुपयाला असू शकते दोनशे तिनशे. पण जगातील सर्वात महागड्या नेलपॉलिशची खरी किंमत ऐकून धक्का बसेल. एवढ्या रुपयांमध्ये तर गाडी, दागिने, घर खरेदी करु शकतो.
जगातील सर्वात महागड्या नेलपॉलिशचे नाव अॅझेचर आहे. हे काळ्या रंगाचे नेलपॉलिश लॉस एंजेलिस येथील डिझायनर अॅझेचर पोगोशियन यांनी तयार केले आहे. या नेलपेण्टची किंमत 250000 डॉलर्स आहे, म्हणजेच हिंदुस्थानी बाजारपेठेत या नेल पॉलिशची किंमत 1 कोटी 90 लाख रुपये आहे.
अॅझेचर ब्रँडची ही नेलपॉलिश डिझाइन करणाऱ्या डिझायनरने त्यात 267 कॅरेट काळ्या हिऱ्यांचा समावेश केला आहे. यामुळेच या नेलपॉलिशची किंमत इतकी जास्त आहे. मात्र अॅझेचर पोगोशियनने डिझाइन केलेल्या या नेलपॉलिशशिवाय बाजारात अनेक महागडे नेलपॉलिश उपलब्ध आहेत. त्या नेलपॉलिश वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात.


























































