चकमकीत जखमी झालेला जवान छत्तीसगडमध्ये शहीद

213

छत्तीसगडमधील नारायणपूर जिह्यात नक्षलवाद्यांशी शनिवारी झालेल्या चकमकीत जखमी झालेला डीआरजीचा जवान राजू नेताम याचा जंगलातून बाहेर काढीत असताना रात्री उशिरा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी आज सांगितले.

नारायणपूर जिह्यात धुरबेडा गावानजीकच्या माओवाद्यांच्या अभुजामद परिसरातील दाट जंगलात नक्षलवाद्यांचे प्रशिक्षण शिबीर सुरू होते. या कॅम्पवर जिल्हा राखीव दलाच्या (डीआरजी) सुमारे 100हून अधिक जवानांनी शनिवारी पहाटे 6 वाजता धाड घातली. या वेळी झालेल्या चकमकीत 5 नक्षलवादी ठार, तर दोन जवान जखमी झाले होते.

जखमी जवान राजू नेताम आणि सोमारू गोटा यांना हेलिकॉप्टरने हलवण्याचा सुरक्षा दलाने प्रयत्न केला. मात्र तेथे जोरदार पाऊस सुरू असल्याने बचाव मोहिमेत अडथळे आले.

जवानांनी जखमी सहकार्‍यांना खाटेसह खांद्यावर घेऊन जंगलातून दीर्घ काळ चालत चालत ओर्छा येथे आणले. चकमकीनंतर तब्बल 15 तासांनी त्याच्यावर उपचार सुरू झाले. मात्र त्यापूर्वीच नेताम यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, तर सोमारू गोटा याला रायपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले. या चकमकीतील मृत नक्षलवादींची ओळख अद्यापि पटली नाही.

आठ लाखांचे इनाम असलेल्या नक्षलीचे  आत्मसमर्पण

नक्षलवाद्यांच्या अनेक घातपातांच्या कारवायांमध्ये सक्रिय असलेला अनेक दिसांपासून पोलिसांना हवा असलेल्या नक्षलवाद्यांच्या एका डेप्युटी कमांडरने छत्तीसगडमधील दंतेकाडा येथे आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. मुचकी बुद्र ऊर्फ नरेश (32) असे त्याचे ना असून त्याच्यावर तब्बल आठ लाख रुपयांचे बक्षीस होते.

आपली प्रतिक्रिया द्या