
WPL 2026 चा चौथा हंगाम अवघ्या काही दिवसांनी सुरू होणार आहे. चौकार आणि षटकरांची आतषबाजी पाहण्यासाठी चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. अशातच युपी वॉरियर्सने आपल्या कर्णधाराची घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला आहे. युपी वॉरियर्सने दीप्ती शर्माला 3.20 कोटी रुपयांची बोली लावत संघात घेतले होते. दीप्ती शर्माची कर्णधारपदी निवड होईल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र युपी वॉरियर्सन ऑस्ट्रेलियाची आणि दिल्ली कॅपिटल्स संघाची माझी कर्णधार मॅग लॅनिंगवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
युपी वॉरियर्सने मॅग लॅनिंगला 1.9 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेतले होते. मॅग लॅनिंगच्या नेतृत्वात दिल्लीने मागील तिन्ही हंगामांमध्ये अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र संघाला विजेतेपदा पटकावून देण्यात तिला यश आले नाही. यंदाच्या हंगामात युपी वॉरियर्सचे नशीब मॅग लॅनिंगच्या नेतृत्वात उजळणार का? हे पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. मॅग लॅनिंग उत्कृष्ट कर्णधार आणि विस्फोटक फलंदाज आहे. मॅग लॅनिंगच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने तब्बल पाच वेळा टी-20 वर्ल्ड कप उंचावण्याची किमया साधली. तसेच 2022 सालचा वनडे वर्ल्डकप सुद्धा तिच्याच नेतृत्वाने ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. WPL चा विचार करता आतापर्यंत मॅग लॅनिंगने 27 सामन्यांमध्ये 952 धावा केल्या आहेत. तसेच दिल्ली कॅपिटल्सला तिन्ही वेळा अंतिम फेरीत पोहोचवण्यात मोलाची कामगिरी पार पाडली आहे.





























































