‘तेजोमयी’ व्यक्तिमत्त्वाची ओळख चारुशीला निरगुडकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाशिवरात्रीचे औचित्य साधून ग्रंथाली प्रकाशित आणि चारुशीला निरगुडकर लिखित ‘तेजोमयी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात पार पडला. लीलाताई निरगुडकर या ऋषितुल्य कलासक्त आणि समाजसेवी व्यक्तिमत्त्वाचे पैलू या पुस्तकात त्यांच्या सुनबाईंनी शब्दबद्ध केले आहेत हे या पुस्तकाचे वैशिष्टय़ आहे.

विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम, डॉ आनंद नाडकर्णी, भरत दाभोळकर, सुबोध भावे, आरती अंकलीकर, भूषण गगराणी, प्रदीप वेलणकर, रामदास पाध्ये, पं.सतीश व्यास, सुदेश हिंगलासपूरकर, आशुतोष डुंबरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या प्रसंगी राष्ट्रीय पारितोषिक विजेती सावनी रविंद्र यांचे स्वरमयी सांगीतिक अभिवादन सादर केले. लेखिका चारुशीला निरगुडकर यांची मुलाखत डॉ. समीरा गुजर यांनी घेतली. मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांनी अभिवाचन केले. मंदार, मंजिरी आणि प्रतिभा निरगुडकर यांनी लीलाताईंच्या आठवणी जागवल्या. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. सुधीर निरगुडकर यांनी आभार प्रदर्शन केले.