‘अंडरटेकर’ने घेतला WWE चा निरोप; WWE ने असा केला सन्मान…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

WWE सुपरस्टार ‘द अंडरटेकर’ स्पोर्ट्स एन्टरटेन्मेंट क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखला जातो. अनेक महिन्यांपासून अंडरटेकर WWE मधून निरोप घेणार असल्याचा चर्चा सुरू होत्या. अखेर त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. लास्ट राईडच्या फायनल एपिसोड दरम्यान त्याने ही घोषणा केली आहे. WWE नेही त्याला निरोप देत #ThankYouTaker या हॅशटॅगचा वापर करून त्याला सन्मान दिला आहे.

33 व्या रेसलमेनिया फाईटमध्ये रोमनविरुध्दच्या सामन्यात पराभवानंतर त्याने WWEमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती. मात्र त्याने निवृत्ती घेतली नाही. ‘द अंडरटेकर’ हे नाव रेलिंगच्या जगातले सर्वात प्रसिद्ध नाव आहे. अंडरटेकर जवळपास 32 वर्षांपासून रिंगमध्ये फाईटिंग करताना आपल्याला दिसत आहे. 54 वर्षीय अंडरटेकरची WWEच्या सामन्यात एक वेगळीच स्टाइल पाहायला मिळते. अंडरटेकर रिंगमध्ये येण्याआधी सर्वत्र अंधार केला जातो आणि घंटांचा आवाज केला जातो.