डब्ल्यूडब्ल्यूईचा प्रसिद्ध खेळाडू जेम्स हॅरिस कमाला याचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते 70 वर्षांचे होते.
डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये आपल्या चेहर्यावरील पेंटसाठी तो नेहमीच चर्चेत असायचा.
जेम्सने 1984 मध्ये डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये पदार्पण केले होते. तो आपल्या कारकीर्दीत आंद्रे द जॉईंट, हल्क होगन, अंडरटेकरसह अनेक मोठ्या सुपरस्टार्सविरूद्ध खेळला.
उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या त्रासाने ग्रासलेल्या जेम्सचा 2011 मध्ये त्याचा डावा पाय कापण्यात आला होता. यानंतर त्याला या आजाराचा त्रास वाढल्याने एक वर्षानंतर त्याचा उजवा पाय देखील कापला गेला होता.