
सेंट झेवियर्स काॅलेजच्या मराठी वाड्.मय मंडळातर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नृत्य, नाटय़, कला, काव्य आणि संगीत या सर्वांचा सुंदर मिलाफ या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. अभंग, संतवाणी, वाघ्या मुरळी नृत्य यांच्या सादरीकरणातून महाराष्ट्राची संस्पृती आणि परंपरा दाखवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मराठी वाड्.मय मंडळाच्या यू-टय़ूब वाहिनीवर 1 मे रोजी सायंकाळी 5 वाजता प्रक्षेपित केला जाणार आहे.
दरवर्षी मंडळाच्या वतीने महाराष्ट्र दिन मोठय़ा जल्लोषात साजरा केला जातो. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. राज्यातील गड-किल्ले याविषयी माहितीचादेखील या कार्यक्रमात समावेश असणार आहे. आजूबाजूच्या नकारात्मक वातावरणात या कार्यक्रमाच्या माध्यमातून थोडी सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महाराष्ट्राची देदीप्यमान संस्पृती आम्हाला वारशात लाभली आहे. या कार्यक्रमातून या समृद्ध संस्पृतीप्रति कृतज्ञता आम्ही व्यक्त करत आहोत, असे मराठी वाड्.मय मंडळाच्या विद्यार्थी प्रतिनिधीने सांगितले.





























































