तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी शी जिनपिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शी जिनपिंग यांच्या राष्ट्राध्यक्षपदावर नॅशनल पीपल्स पार्टीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे जिनपिंग यांची ताकद वाढली आहे. माओ त्से तुंग यांच्यानंतर पहिल्यांदाच प्रदीर्घ काळ चीनचे राष्ट्राध्यक्षपद भूषवण्याचा मान जिनपिंग यांना मिळाला आहे.

नॅशनल पीपल्स काँग्रेसने चीनच्या खासदारांची 14 वी बैठक घेतली. आठवडाभर सुरू असलेल्या बैठकीत जिनपिंग यांच्या झीरो कोविड नीतीवर खासदारांनी काही प्रश्न उपस्थित करून जिनपिंग यांच्यासमोर आव्हान निर्माण केले. मात्र अखेरीस राष्ट्राध्यक्ष म्हणून जिनपिंग यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केले. आता ते त्यांचे निकटबर्ती लि कियांग यांची प्रीमियर अर्थात पंतप्रधानपदी वर्णी लावतील असे सांगण्यात येते. जिनपिंग यांना पीपल्स लिबरेशन आर्मीचे कमांडर म्हणूनही नियुक्त करण्यात आले आहे. शी जिनपिंग हे 2012 पासून चीनचे राष्ट्राध्यक्षपद भूषवीत आहेत.