शाओमीने ‘या’ तीन स्मार्टफोनच्या किंमतीत केली वाढ; जाणून घ्या किती…

3157

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने आपल्या काही स्मार्टफोनच्या किंमती पुन्हा एकदा वाढ केली आहे. काही महिन्यांपूर्वी सरकारने स्मार्टफोनवरील जीएसटी 12% वरून 18% केली आहे. यानंतर शाओमीने आपल्या स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ केली होती. आता शाओमीने Redmi Note 8, Redmi 8 आणि Redmi 8A Dual च्या किंमतीत वाढ केली आहे.

शाओमीने Redmi Note 8 च्या किंमतीत 500 रुपयांनी वाढ केली आहे. आता Redmi Note 8 च्या 4 जीबी + 64 जीबी किंमत 11,999 रुपये, तर 6 जीबी + 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 14,499 रुपये झाली आहे. तसेच Redmi 8 च्या किंमतीत ही वाढ झाली आहे. याच्या 4 जीबी + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,499 रुपये इतकी झाली आहे. कंपनीने याच्या किंमतीत 1500 रुपयांनी वाढ केली आहे. यासोबतच Redmi 8A Dual च्या किंमतीत 1,000 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता 2 जीबी + 32 जीबी व्हेरिएंटची किंमत 7,499 रुपये इतकी झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या