यामी गौतमचा पोल डान्स बघितलात का ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

फिटनेस क्रेझी असलेली अभिनेत्री म्हणून यामी गौतमला ओळखलं जातं. तिच्या या फिटनेसचं रहस्य पोल डान्स असल्याचं समोर आलं आहे. यामीने तिच्या इन्स्टाग्रामवर पोल डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ ८ लाखाहून अधिक लोकांनी बघितला असून तिचे कौतुकही केले आहे.

व्हिडीओखाली तिनं हे कठीण काम असून या डान्सची मी क्रेझी असल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी तिने एका मुलाखतीतही पोल डान्सबद्दल सांगितल होतं. या डान्सने आपल्याला वेड लावल्याच ती म्हणाली होती. फिटनेस आणि डान्स याच्यावर माझं प्रेम आहे. फिट राहण्याचा पोल डान्स हा सगळ्यात उत्तम प्रकार आहे, असं ती म्हणाली होती. याआधीही यामीने इन्स्टाग्रामवर पोल डान्सचा व्हिडीओ पोस्ट केला होता. पण त्यावर तिनं काहीही सांगितल नव्हतं. आता मात्र तिने पोल डान्सचे आपण क्रेझी झाल्याचं म्हटलं आहे.