तुकडे तुकडे गँगमध्ये फक्त दुर्योधन आणि दुश्शासन, दोन्ही भाजप मध्येच; यशवंत सिन्हा यांची टीका

माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. ‘तुकडे तुकडे गँगमध्ये फक्त दोनच लोकं, दुर्योधन आणि दुश्शासन. ते दोघेही भाजपमध्येच आहेत’, अशी टीका यशवंत सिन्हा यांनी केली आहे. त्यांनी वरील आशयाचे ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

याआधी इतिहासतज्ञ रामचंद्र गुहा यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली होती. गुहा यांना बंगळुरू येथे नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन केल्याप्रकरणी ताब्यात घेतले होते. तेथून टाकून झाल्यानंतर गुहा यांनी ‘खरी तुकडे तुकडे गँग ही दिल्लीत बसली आहे. तेच धर्म व भाषेच्या नावावर देशाचे विभाजन करत आहेत. आम्ही त्यांचा शांततेच्या मार्गाने विरोध करू’, असे गुहा म्हणाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या