नाना पाटेकरांच्या बदनामीविरोधात यवतमाळमध्ये तनुश्री दत्ताच्या प्रतिमेची होळी

12

सामना ऑऑनलाईन । यवतमाळ

अभिनेते नाना पाटेकर यांच्यासाठी यवतमाळमधील महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील हजारो शेतकरी विधवांना वडिलभावाच्या रूपाने नाना मदत करतात. तनुश्री दत्ताने नाना यांच्यावर केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही, असे सांगत यवतमाळमधील पांढरकवडा येथे विदर्भ शेतकरी विधवा संघटनेतर्फे निदर्शने करण्यात आली. ‘आमच्या नानाभाऊची बदनामी बंद करा’ अशी घोषणाही यावेळी महिलांनी केली. प्रसिद्धीसाठी तनुश्री नानांची बदनामी करत असल्याचा आरोप करत तनुश्री दत्ताच्या प्रतिमेची होळी करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या