
सामना प्रतिनिधी। राहुरी
महावितरण विभागाच्या बेजबाबदार कारभारामुळे तालुक्यातील वळण येथे एका १९ वर्षाच्या तरुणाचा शॉक लागून दुदैवी मृत्यु झाला आहे. गणेश अरूण गाढवे असे या तरुणाचे नाव आहे. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता ही दुदैवी घटना घडली. गणेशला नुकत्याच लागलेल्या बारावी परिक्षेत ६१ टक्के गुण मिळाले होते. खूप शिकण्याची त्याची इच्छा होती. पण त्याचे हे स्वप्न अपूर्णच राहीले.
अरुण त्शेयाच्जाया घराशेजारी असलेल्रया ऊसाच्या शेतात जनावरांना चारा आणण्यासाठी गेला होता. चारा गोळा करत होता. त्याचवेळी पोलवरून जमिनीच्या दिशेला झुकलेल्या विद्यृत वाहिनीला त्याचा चुकुन स्पर्श झाला. यामुळे गणेशला जबर शॉक लागला व तो खाली कोसळला.
ही घटना घडली तेव्हा गणेशचा मित्र अमोल थोरात हा काही अंतरावर उभा होता. गणेश कोसळताच अमोलने मदतीसाठी आरडाओरड केला .या आवाजाने परिसरातील शेतक-यांनी घटनास्थळी धाव घेतली. गणेशला तातडीने राहुरीच्या ग्रामीण रूग्णाल्यात हलविण्यात आले. पण त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले
आपला मुलगा विजेचा शाॅक लागुन मरण पावल्याची खबर मिळताच गणेशच्या आई वडीलांनी हंबरडा फोडला.आज दुपारी राहुरी येथे शवविच्छेदना नंतर गणेशचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे वळण परीसरात शोककळा पसरली असून महावितरणच्या गलथान कारभारा बाबत नागरीकांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे.




























































