
सोनी बीबीसी अर्थ लवकरच ‘यंग अर्थ चॅम्पियन्स’चे दुसरे पर्व सादर करणार आहे. ही स्पर्धा नवीन उत्साह व रुचीसह सहावी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. यंदाची थीम ‘संवर्धना’च्या गरजेबाबत संवादांना चालना देण्याशी संबंधित आहे. स्पर्धेमध्ये निसर्गाची संसाधने जसे पाणी, जमीन, वन्यजीव, जंगल व ऊर्जा यांचे संवर्धन कशा प्रकारे करता येईल यासंदर्भात नवविचार पाहायला मिळतील. आपल्या संसाधनांचे जतन करणे आणि पर्यायी माध्यमांचा शोध घेणे हे निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि लहान पिढी योग्य आवाज उठवण्यासह ते त्याबाबत जागरूक आहेत. या संदेशाच्या प्रसारासाठी अभिनेता जिम सार्भची निवड केली आहे, जो या मोहिमेसाठी स्थिरता व पर्यावरण संवर्धनाचा प्रबळ समर्थक आहे.
























































