वडवणी तालुक्यात पुन्हा तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

84

सामना प्रतिनिधी । वडवणी

नापिकी व सततच्या दुष्काळामुळे हैराण झालेल्या देवडी, ता. वडवणी येथील नागेश भिकाजी नाईकवाडे वय २५ या तरुण शेतकऱ्याने मंगळवार रोजी पहाटे विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.

वडवणी तालुक्यातील देवडी येथील नागेश भिकाजी नाईकवाडे वय २५ असे मयताचे नाव आहे. नागेश हा आई -वडील पाच भाऊ व एका बहिणीसह देवडी येथे राहायचा. घरची परिस्थिती गरिबीची आहे. शेतीसाठी घेतले कर्ज फिटत नसल्याने नागेश हा नैराश्यात होता. आज पहाटे नागेश हा त्याच्या शेतात गेला होता. परंतु त्याला उशीर झाल्याने वडील भिकाशी नाईकवाडे हे शेतात गेले तेव्हा गोठ्यात नागेश अत्यवस्थेत आढळून आला. गरिबी व नापिकी यामुळे त्याने विषारी द्रव घेतल्याचे त्याने वडिलांना सांगितले. दरम्यान, त्यांनी तातडीने नागेश यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले.

आपली प्रतिक्रिया द्या