K3G मधील छोटी ‘पू’ मालविका राज अडकली लग्नबंधनात!

 

बॉलीवूडचा ब्लॉक बस्टर चित्रपट ‘कभी खुशी कभी गम’ हा आजही तितकाच लोकप्रिय आहे. या चित्रपटातील पात्रांनी लोकांची मने जिंकली होती. कभी खुशी कभी गम या चित्रपटात करीना कपूरच्या लहानपणीचे पात्र अभिनेत्री मालविका राजने साकारले होते. मालविका सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. आपल्या गोंडसपणाने चाहत्यांची मने जिंकणारी मालविका राज आज लग्नाच्या बंधनात अडकली आहे.मालविकाने बिझनेसमन प्रणव बग्गासोबत लग्न केले आहे. गोव्यामध्ये या दोघांचा विवाहसोहळा पार पडला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malvika Raaj (@malvikaraaj)

मालविकाने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.ज्यामध्ये दोघांनी सोनेरी रंगाचे पोशाख परिधान केले आहेत.मालविकाने गोल्डन लेहेंगा घातला आहे तर प्रणवने गोल्डन शेरवानी घातली आहे. यांच्या वेडिंग लुकवर नेटकरी फिदा झाले आहेत. तसेच बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी देखील या दोघांना त्याच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मालविका राजचा पती प्रणव बग्गा हा एक बिझनेसमन आहे. तसेच तो डिजिटल मार्केटिंग कंपनी, जिम आणि फॅशन कंपनीचा डायरेक्टर देखील आहे. मालविकाने ऑगस्ट 2023 च्या सुरुवातीला प्रणवसोबतच्या लग्नाची घोषणा केली होती. प्रणवने तिला तुर्कीमध्ये प्रपोज केले होते. त्यावेळी देखील त्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या रिलेशनचा खुलासा केला होता.