क्वारंटाईन संपवून घरी जाण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

2837

पुण्यावरून गावी परतलेल्या आणि शाळेतील क्वारंटाईनची 14 दिवसाची मुदत पूर्ण करून घरी परतण्याच्या तयारीत असणाऱ्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. पृथ्वीराज पाटील (वय – 28, रा. आकुर्डे, ता. पन्हाळा) असे या मृत्यू झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धामणी खोऱ्यातील बळपवाडी, पणुत्रे व हरपवडे, निवाचीवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आसपासच्या गावात भीतीचे वातावरण आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन केले जाते.

पृथ्वीराज पाटील हा तरुण पुणे येथून 13 मे रोजी आकुर्डे येथे गावी आला होता. त्याला ग्रामसमितीने प्राथमिक शाळेत क्वारंटाईन केले. त्याचे क्वारंटाईन 14 पैकी तेरा दिवस पूर्ण झाले होते. उद्या त्याला घरी सोडण्यात येणार होते. पण आज सकाळी 11 च्या सुमारास त्याला ह्रदयविकाराचा जोराचा झटका आला. तातडीने त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या