पाण्याचा अंदाज न आल्याने पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा वाण धरणात बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परळी वैजनाथ शहरातील जुना रेल्वे स्थानक भागातील शेख तालेब शेख जानी (वय 24)हा तरुण नागपूर वाण धरणात मित्रासोबत पोहण्यासाठी गेला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. परळी तहसीलचे नायब तहसीलदार बाबुराव रुपनर व त्यांचे महसूलचे कर्मचारी, ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी सह पोलीस निरीक्षक मारोती मुंडे व ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असून शोध मोहीम सुरु आहे.

मृत शेख तालेब हा वाण धरणात आपल्या मित्रासोबत पोहण्यासाठी गेला होता. वाण धरण पूर्ण क्षमतेने भरले असून पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस व्यक्त करण्यात येत आहे. धरण पूर्ण भरले असल्याने त्याच्या मृतदेहाच्या शोधकार्यात अडचणी निर्माण होत आहेत. मृत शेख तालेब याची मोटारसायकल वाण धरणाजवळ आढळून आली आहे.