तरुणाचा घोड्यावर बलात्कार, सीसीटीव्हीतून मिळाले पुरावे; तरुणाला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील टेक्सास शहरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने घोड्यावरच बलात्कार केला आहे. याबाबतच्या तपासात त्याने या घटनेचा इन्कार केला. मात्र, सीसीटीव्ही फूटेजमधील पुरावे आणि डीएनए तपासणी अहवालानुसार तो दोषी आढळला असून न्यायालयाने त्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

घोड्याच्या पागेत जाऊन घोड्याशी अनैसर्गिक संभोग करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याचे नाव जीन मॅरी बुगोमा असे आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने घटनेचा इन्कार केला. त्यानंतर पोलिसांनी घोड्यांच्या पागेतील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली आणि घोड्यांचे डीएनएचे नमुने तपासणीसाठी पाठवले. त्यात तो दोषी आढळला आहे. nypost.com ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

जून 2020 ते फेब्रुवारी 2021 या काळात तीनवेळा हे घृणास्पद कृत्य केले आहे. सीसीटीव्ही फूटेजमध्ये बुगोमा घोड्यांच्या पागेत विवस्त्रावस्थेत फिरताना दिसला होता. त्यानंतर दोन घोडे जखमी झाल्याचे पागेच्या मालकाला आढळले. त्यावेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोड्यावर अनैर्गिक संभोग झाल्याने ते जखमी झाल्याचे सांगितले. त्यावेळी मालकाला बुगोमावर संशय आला नाही.

या घटनेनंतर काही महिन्यांनी घोड्यांच्या पागेत बुगोमा तशाच अवस्थेत फिरताना दिसला. त्यावेळी मालकाला संशय आला आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी बुगोमाला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने घटनेचा इन्कार केला. मात्र, सीसीटीव्ही फूटेज आणि डीएनए तपासणीत तो दोषी आढळला. तसेच दोन घोड्यांचे पाय रस्सीने बांधल्याचेही अधिकाऱ्यांना आढळून आले.

पोलीस अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फूटेज आणि डीएनएचा अहवाल आणि पागेत आढळलेले पुरावे न्यायालयासमोर सादर केले. त्यानंतर बुगोमाने आपला गुन्हा मान्य केला. न्यायालयाने प्राण्यांवर अनैर्गिक संभोग केल्याप्रकरणी बुगोमाला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.