मोटारीवर आदळल्याने दुचाकीस्वार तरुण ठार

रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या मोटारीवर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार झाल्याची घटना काल संध्याकाळी विमानतळ रस्त्यावर घडली. हरमीत सुरेंद्रपाल सिंग (30, रा. संतनगर, लोहगाव) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

रविवारी संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास दुचाकीस्वार सिंग भरधाव वेगाने विमानतळ रस्त्याने निघाले होते. त्यावेळी येरवड्यातील नागपूर चाळीसमोर रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या मोटारीवर दुचाकीस्वार सिंग आदळून गंभीर जखमी झाले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गुरव तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या