तरूणाच्या डोक्यात घाव घालून सोनसाखळी हिसकावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यात भरदिवसा पादचारी तरूणाचा पाठलाग करून त्याच्या डोक्यात घाव घालून चोरट्यांनी दोन लाखांची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. 25 ऑगस्ट रोजी दत्तवाडी येथे ही घटना घडली. याप्रकरणी महेंद्र चौधरी (वय 49) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महेंद्र हे गुरूवारी सकाळी सातच्या सुमारास दत्तवाडी परिसरातील मंदीरात दर्शन घेण्यासाठी पायी जात होते. त्यावेळी ते झोपडपट्टीतील बोळीत आल्यानंतर चोरट्यांनी त्यांचा पाठलाग केला. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात कठीण वस्तूने मारून गळ्यातील दोन लाखांची सोनसाखळी हिसकावून नेली. यावेळी त्यांनी आरडाओरडा केला. परंतु चोरटे पसार झाले. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे करत आहेत.