
प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. ते कधी कोणावर होईल हे सांगता येत नाही. अमेरिकेतील केंटुकी येथे अशीच एक घटना घडली आहे. येथील एका महिलेचे चक्क तिच्या चुलत सासऱ्यावरच प्रेम जडले. एरिका क्विग असे या महिलेचे नाव आहे. एरिका 19 वर्षाची असताना तिचे लग्न जस्टीन टॉवेल नावाच्या एका तरुणाशी झाले होते. लग्नानंतर त्यांना दोन मुले झाली, मात्र काही वर्षांनी एरिका आणि तिचा नवरा जस्टीन यांचे आपसांत पटेनासे झाले. वारंवार त्यांची भांडणे होऊ लागली. सतत होणारे वाद विकोपाला गेल्यामुळे 2017 रोजी दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले.
त्यानंतर एरिकाचे चुलत सासरे जेफ क्विगल यांनी तिला खूप आधार दिला. ती त्यांच्यासोबत राहू लागली. एक दिवस सासरे जेफ यांनी एरिकाला लग्नाची मागणी घातली. एरिका आता 31 वर्षांची असून सासरे जेफ 60 वर्षांचे आहेत. या दोघांमध्ये 29 वर्षांचे अंतर असूनही दोघांनी लग्न केले
सासरे जेफ यांच्यापासून एरिकाला एक मुलगी झाली. एरिकाची सर्व मुले तिच्यासोबतच राहतात. एरिकाच्या कठीण परिस्थितीत सासरे जेफ यांनी तिला आधार दिल्यामुळे ते तिला आयुष्यभराचे सोबती वाटतात. वय वाढलं असलं तरी जेफ यांचे मन अजूनही तरुण असल्याचे एरिका सांगते. तर एरिकाविषयी सासरे जेफ सांगतात, आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडताना कधीही वयातील अंतराचा विचार केला नाही.




























































