‘मरे’ बनली मृत्यूचा सापळा, तरुणाचा ट्रेनमधून पडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । डोंबिवली

मुंबईच्या रेल्वे प्रवासात गर्दीमुळे रेल्वेतून पडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. मध्य रेल्वे मार्गावरील कोपर येथे ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू झाला असून कोपर रेल्वे अपघातात 38 वा बळी गेला आहे.

शिव वल्लभ गुजर (वय 26) असे मृत तरुणाचे नाव असून जलद लोकलमधून पडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शास्त्रीनगर रुग्णालयात त्याचा मृतदेह ठेवण्यात आला होता. तिथे जमलेल्या नातेवाईकांचा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केल्याचे वृत्त आहे.