मोबाईल, लॅपटॉपच्या व्यसनात तरुणाई बनतेय सायको: मानसिक उपचारांची गरज

917

लॅपटॉपवर डोके खुपसून बसलेल्या मुलाची काळजी म्हणून वायफाय डिस्कनेक्ट करणाऱ्या वडिलांवर त्या मुलाने हल्ला केल्याचा प्रकार ऐकून मानसोपचार तज्ञांचेही डोके भनभनले. मोबाईल फोन आणि लॅपटॉपच्या व्यसनात तरुणाई ‘सायको’ बनत चालली आहे. प्रत्येकी शंभरपैकी पाच तरुण हे रोज 15-15 तास मोबाईल, लॅपटॉपवर खेळत असतात. या व्यसनाच्या ते आहारी गेले आहेत. त्यांना सतत ऑनलाइन राहण्याची नशा चढली आहे. परिणामी त्यांना मानसिक आजार जडू लागले आहेत.

तंबाकू सेवन, धूम्रपान, मद्यपान, अंमली पदार्थ यांचे व्यसन करून शारीरिक व मानसिक आजार जडलेल्या शेकडो रुग्णांवर आम्ही उपचार केले. पण आता मोबाईल, लॅपटॉपच्या नशेमध्ये बुडालेल्या तरुणाईवर उपचार करण्याची वेळ आल्याची खंत मसिना रुग्णालयाचे मानसोपचारतज्ञ डॉ. युसूफ माचिसवाला यांनी व्यक्त केली.

मोबाईल गेम खेळणाऱ्या मुलाच्या हातातून फोन काढून घेतल्याने त्याने संतापून महागडा फोनच फोडून टाकला आणि अंगावर धावून आला अशी तक्रार घेऊन एक दांपत्य आपल्याकडे आले होते. रोज असे किमान 5-6 रुग्ण आपल्याकडे उपचारासाठी येत असल्याचे डॉ. माचिसवाला यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या