फेक प्रोफाईलवरून महिलांना पाठवत होता अश्लील मेसेज, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

दिल्लीत एका तरुणाने फेसबुकवर फेक प्रोफाईल बनवले होते. या प्रोफाईलवरून तो मुलींना, महिलांना अश्लील मेसेज पाठवत होता. या प्रकरणी पोलिसांनी काफिल या तरुणाला अटक केली आहे.

दिल्लीत काफिल हा तरुण दिल्ली विद्यापीठात शिकत होता. फेसबुकवर त्याने करण नावाने एक फेक प्रोफाईल बनवले होते. या प्रोफाईलवरून तो महिला, तरुणींना रिक्वेस्ट fपाठवायचा. तसेच या प्रोफाईलवरून महिलांना अश्ली. मेसेज पाठवायचा. अखेर एका महिलेने पोलिसांत तक्रार केली. तेव्हा दिल्लीच्या सायबर पोलिसांनी आयपी ऍड्रेसच्या माध्यमातून त्याचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. पोलिसांनी त्याचा मोबाईलही जप्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या