अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून व्हिडीओ केला व्हायरल, पोलिसांकडून अटक

उत्तर प्रदेशमध्ये एका अल्पवयीन मुलीवर एका 18 वर्षीय तरुणाने बलात्कार केला आहे. तसेच मुलीचा अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

उत्तर प्रदेशच्या महोबा जिल्ह्यात एका 18 वर्षीय तरुणाने एका 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केला. या व्हिडीओवरून तरुणाने मुलीला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केला.

जेव्हा मुलीने आरोपीचे ऐकण्यास नकार दिला तेव्हा तरुणाने तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि अटक केली. या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. 

आपली प्रतिक्रिया द्या