
पूर्ववैमनस्यातून तरुणावर चौघांनी हल्ला केल्याची घटना गोरेगाव येथे घडली. अमीर शेख असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी अनिलकुमार ऊर्फ लपेटू शर्मा, जितेंद्र विंद, गणेश कोकेरिक, ब्रिजेश पासवान चौघांना अटक केली.
अमीर हा गोरेगाव येथे राहतो. मंगळवारी पहाटे तो त्याचा मित्रांसोबत इमारतीजवळ गप्पा मारत उभा होता. तेव्हा तिथे चार जण आले. त्याने पूर्ववैमनस्यातून अमीरशी वाद घातला. त्यानंतर एकाने अमीर आणि त्याच्या मित्रावर कोयत्याने हल्ला केला. त्यात अमीर गंभीर जखमी झाला आहे.


























































