टिक टोकच्या नादात तरुणाचा बुडून मृत्यू

96
tiktok-f

सामना ऑनालाईन । हैदराबाद

हैदराबादमध्ये टिक टोकमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तलाव खूप खोल होता आणि या तरुणाला पोहताही येत नव्हते. जेव्हा हा बुडत होता तेव्हा त्याचा भाऊ व्हिडीओ काढत होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हैदराबादच्या एका तलावात एक तरुण आंघोळ करत होता. हा तलाव खोल होता आणि तरुणाला पोहता येत नव्हते. जेव्हा हा तरुण पाण्यात आंघोळ करताना बुडत होता तेव्हा त्याचा चुलत भाऊ मोबाईलवर टिक टोक व्हिडीओ काढत होता. नंतर जेव्हा त्याच्या भावाला कळाले की हा बुडत आहे तेव्हा त्याने आरडाओरड करून लोकांकडे मदत मागितली. परंतु उशीर झाला होता. लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा मृतदेह आढळला. घटनेनंतर बुधवारी तरुणाच्या मृत्यूपूर्वी काढलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या