
स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा विलास युवक महोत्सव 2019-20 बाभळगाव येथील कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालयात 21 ते 24 सप्टेंबर या कालावधीत आयोजीत करण्यात आला आहे. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत महाविद्यालयाचे प्राचार्य राम वाघ, विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा.डॉ.ज्ञानोबा मुंढे यांनी दिली.
या युवक महोत्सवासाठी 13 सप्टेंबर 2019 पर्यंत प्रवेशिका स्विकारल्या जाणार आहेत. या महोत्सवामध्ये शास्त्रीय संगीत, शास्त्रीय तालवाद्य, शास्त्रीय सुरवाद्य, सुगम गायन (हिंदुस्थानी), सुगम गायन (पाश्चात्य), समुहगायन (हिंदुस्थानी), समुहगायन(पाश्चात्य), कव्वाली, शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, आदिवासी नृत्य,एकांकिका (मराठी, हिंदी), विडंबन( उपरोधिक अभिनय), मुकअभिनय, नक्कल, वादविवाद( मराठी,हिंदी,इंग्रजी), वक्तृत्व (मराठी,हिंदी, इंग्रजी), चित्रकला, कोलाज,पोस्टर पेंटींग, मृदमुर्तीकला, व्यंगचित्रकला, रांगोळी, स्थळ छायाचित्रण, कलात्मक जुळवणी, पोवाडा, लावणी, लोकसंगीत, प्रबोधनात्मक जलसा यांचा समावेश आहे. अतुल्य भारत या विषयावर शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अत्युल्य भारत, अंधार फार झाला, पणती जपून ठेवा, गर्दीतल्या माणसांत, माणूस मी शोधतो, राष्ट्रसमोरील आव्हाने आणि युवकांची भूमिका या विषयावर वक्तृत्वस्पर्धा तर देशातील प्रसारमाध्यम्ये निःपक्षपाती भूमिका बजावत आहेत / नाहीत या विषयावर वादविवाद स्पर्धा होणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, संस्थाचालक उपस्थित होते.

























































