
सामना प्रतिनिधी । वाढवणा
वाढवणा येथून जवळच असलेल्या हाळी येथील युवक ज्ञानेश्वर सत्यनारायण महाजन (३२) हा युवक ३० सप्टेंबर पासून बेपत्ता आहे. सकाळी कापड दुकान उघडण्यासाठी तो घरातून बाहेर निघाला मात्र दुकानाकडे तो गेलाच नाही. त्याचा सगळीकडे शोध घेऊनही तो सापडला नाही.
वाढवणा ठाण्यात विशाल सत्यनारायण महाजन हाळी यांनी ३ सप्टेंबर रोजी ज्ञानेश्वर महाजन बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली असुन सहायक पोलीस निरीक्षक गफ्फार शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पो. का. कासनाळे करीत आहेत.






























































