
पैशावरून झालेल्या वादातून मित्राने मित्राची हत्या केल्याची घटना सांताक्रुझ परिसरात घडली. रणजित चौधरी असे मृताचे नाव आहे. घडल्या प्रकरणी विक्की चौधरीला वाकोला पोलिसांनी अटक केली. रणजित आणि विक्की या मित्रांमध्ये गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये पैशावरून वाद होता. गेल्या गुरुवारी रणजित हा गावदेवी दत्त मंदिर रोड येथे आला. तेथे
विक्कीदेखील आला. तेथे आल्यावर त्यांच्यात पुन्हा वाद निर्माण झाला. विक्कीने रणजितवर वार करून दुखापत केली. त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


























































