
सामना प्रतिनिधी । औसा
औसा तालुक्यातील शिवली येथे आज सकाळी एका तरुणाने आत्महत्या करून आपले जीवन संपवले.
शिवली येथील महालिंग बाबुराव पावले (३८) याने शेतात जाऊन शेतात असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मयत महालिंग यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई – वडिल असा परिवार आहे. त्यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या सातबारावर कोणत्याही बँकेचे कर्ज असल्याची शासन दरबारी नोंद नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.































































