भामटा यूट्यूबर पियूष कत्यालला अटक

महिलेची 19 लाखांची फसवणूकप्रकरणी यूट्यूबरला उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. पियुष कत्याल असे त्याचे नाव आहे. गेल्या आठवड्यात एक महिला फसवणुकीची तक्रार घेऊन उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात आली. पाच महिन्यांपूर्वी ती एक प्रँक व्हिडीओ केल्यावर एकाच्या संपर्कात आली, त्याबाबत तिने पोस्ट केली. पोस्ट केल्यानंतर तिला फॉलो करण्यास सुरुवात केली.

दोघांनी मोबाईल नंबर शेअर केला. त्यानंतर त्याने वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली महिलेकडून पैसे मागितले. नकार दिल्यावर त्याने तिला ब्लॅकमेल केले. ते मेसेज आणि चॅट सार्वजनिक करू अशी धमकी दिली. भीतीपोटी महिलेने 19 लाख रुपये दिले. पैसे दिल्यावर त्याने आणखी पैशांची मागणी केली. घडल्याप्रकरणी महिलेने उत्तर सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली व त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पियुषला ताब्यात घेऊन अटक केली.