पाकिस्तानसाठी हेरगिरी; यूट्यूबरचा जामीन फेटाळला

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या यूट्यूबर ज्योती मल्होत्राचा जामीन अर्ज हरयाणातील हिसार सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपीची जामिनावर सुटका तपासात अडथळा आणू शकते, असे मत न्यायालयाने नोंदवले आहे. हिसार पोलिसांनी 16 मे रोजी ‘ट्रव्हल विथ झो’ हे यूट्यूब चॅनल चालवणाऱ्या 34 वर्षीय ज्योतीला ऑफिशियल सिक्रेट्स अ‍ॅक्ट आणि इंडियन पिनल कोड अंतर्गत अटक केली. ज्योती सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.