
सामना प्रतिनिधी । लोणावळा
शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे मावळ लोकसभा मतदार संघात विशेष लक्ष असून, युवा सेनेचे राज्य पदाधिकारी मावळ मतदारसंघात अहोरात्र मेहनत घेत आहेत. निवडणूकी संदर्भात शिवसेना-युवा सेना, महिला आघाडी, भारतीय विद्यार्थी सेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
युवा सेनेचे राज्य पदाधिकारी गावागावात जाऊन मतदारांना भेट देत आहेत. शुक्रवारी त्यांनी मावळ गोळीबारातील शहीद शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर शहीद शेतकऱ्यांच्या स्मृतीप्रती तयार करण्यात आलेल्या शहीद स्मारकास भेट देऊन अभिवादन केले.
युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य सिध्देश रामदास कदम,साईनाथ दुर्गे,युवा सेना मावळ लोकसभा विस्तारक वैभव थोरात व युवा सेना,भाविसेचे पदाधिकारी,शेतकरी बांधव, उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे नाराज कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज कार्यकर्त्यांनी शुक्रवारी युवा सेनेच्या पदाधिका-यांच्या भेटी घेतल्या.त्यातले बरेचसे नाराज पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
अखिल भारतीय वारकरी संघटना,किसान संघ,अखिल वारकरी संघ यांचा श्रीरंग बारणे यांना पाठिंबा!
अखिल भारतीय वारकरी संघटना,किसान संघ,अखिल वारकरी संघ यांनी महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना पाठिंबा दिला.तसे पत्र युवा सेना कार्यकारिणी सदस्य सिध्देश कदम यांना दिले.

























































