शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना (युवती) पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरुपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
मुंबई समन्वयक ः श्रद्धा कदम, विभाग युवती अधिकारी ः हर्षाली बेलवलकर (विलेपार्ले विधानसभा)





























































