
राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विभाग क्र. 6 मधील युवासेना (युवती) पदाधिकारी जाहीर केले आहे. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येणार आहेत.
कुर्ला विधानसभा – युवती
विभाग युवती अधिकारीपदी मेघना पवार यांची तर उपविभाग युवती अधिकारीपदी शुभांगी शिंदे (शाखा क्र. 168, 170, 171), अश्विनी ढमाळ (शाखा क्र. 149, 151, 169) यांच्या तर विधानसभा चिटणीसपदी तेजश्री शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शाखा युवती अधिकारीपदी लक्ष्मी जाधव (शाखा क्र.149), उपशाखा युवती अधिकारीपदी प्रतीक्षा यादव (शाखा क्र. 149), शाखा युवती अधिकारीपदी प्रियंका होवाळ (शाखा क्र. 152), सुप्रिया मांढरे (शाखा क्र. 168) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. शाखा युवती अधिकारीपदी सजेली हिर्लेकर (शाखा क्र. 169), उपशाखा युवती अधिकारीपदी श्रद्धा पाटील (शाखा क्र. 169), सुप्रिया सावंत (शाखा क्र. 169), शाखा युवती अधिकारीपदी नमिता भोईर (शाखा क्र. 170), उपशाखा युवती अधिकारीपदी मयूरी चव्हाण (शाखा क्र. 170), पूजा कडू (शाखा क्र. 170) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शाखा युवती अधिकारीपदी दीक्षा महाडीक (शाखा क्र. 171), उपशाखा युवती अधिकारीपदी रूपाली अनुसे (शाखा क्र. 171), त्रिशा पारटे (शाखा क्र. 171) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
कलिना विधानसभा – युवती
विभाग युवती अधिकारीपदी श्रुतिका कदम, उपविभाग युवती अधिकारीपदी आरती सदरम (शाखा क्र. 89, 90, 91), सुप्रिया भुरवणे (शाखा क्र. 165, 166, 167) यांची तर विधानसभा चिटणीसपदी मीनल नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शाखा युवती अधिकारीपदी नमिता खाके (शाखा क्र. 89), रितू नायडू (शाखा क्र. 90), रक्षदा परब (शाखा क्र. 91), सिमरण कदम (शाखा क्र. 165), साक्षी तावडे (शाखा क्र. 166), मयूरी गायकवाड (शाखा क्र. 167) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
चांदिवली विधानसभा – युवती
विभाग युवती अधिकारीपदी अस्मिता सावंत यांची तर विधानसभा समन्वयकपदी तृष्णा पाटील (शाखा क्र. 158) यांची नियुक्ती केली आहे. उपविभाग युवती अधिकारीपदी मयूरी जाधव (शाखा क्र. 156, 157), पूजा दुबे (शाखा क्र. 158, 159), संजना साळवी (शाखा क्र. 160, 161), रचना मोरे (शाखा क्र. 162, 163), जान्हवी गावडे (शाखा क्र. 164, 166) यांच्या तर विधानसभा चिटणीसपदी प्रज्ञा जाधव (शाखा क्र. 156, 157, 158), निकिता राणे (शाखा क्र. 159, 160, 161), रेश्मा कटकधोंड (शाखा क्र. 162, 163, 164) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शाखा युवती अधिकारीपदी अक्षता पवार (शाखा क्र. 156), कशिश पवार (शाखा क्र. 157), अक्षता नवार (शाखा क्र. 158), मिताली सावंत (शाखा क्र. 159), सोपिणा डिसोझा (शाखा क्र. 160), अक्षया भोसले (शाखा क्र. 161), मनाली सकपाळ (162), श्वेता पुळके (शाखा क्र. 163), राणी कदम (शाखा क्र. 164), हर्षदा मोटे (शाखा क्र. 166) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.






























































