सावली साथ सोडणार! मुंबईत 15-16  मे रोजी ‘शून्य सावली’चा अनुभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

मुंबई आणि उपनगरांत 15-16 मे रोजी ‘शून्य सावली’चा अनुभव घेता येईल. यावेळी आपली सावली आपली साथ सोडेल. मुंबईत शुक्रवार, 15 मे रोजी दुपारी 12.35 वाजता उन्हात उभे राहिल्यास आपली सावली नेमकी पायाखाली येणार आहे. तर ठाणे, डोंबिवली, कल्याण, बोरिवली येथे हाच अनुभव शनिवार, 16 मे रोजी दुपारी 12.35 वाजता घेता येईल. याविषयी माहिती देताना खगोल अभ्यासक दा. पृ. सोमण  म्हणाले की, उत्तर गोलार्धातील कर्पवृत्त ते दक्षिण गोलार्धातील मकरवृत्त यामधील प्रदेशातूनच हा अनुभव घेता येऊ शकतो.