सामना ऑनलाईन । मुंबई
बॉलिवूड किंग शाहरुख खानचा बहुचर्चित चित्रपट ‘झिरो’चा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. शाहरुखच़्या वाढदिवशीच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. वडाळ्याच्या आयमॅक्स थेटरमध्ये हा ट्रेलर लॉन्चचा सोहळा पार पडला. ‘झिरो’च्या ट्रेलर लॉन्चसाठी आयमॅक्सला मेरठ शहराचे रूप देण्यात आले होते. शाहरुख खानच़्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
‘झिरो’ या चित्रपटात शाहरुख खान बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. बुआ सिंग असे त्या व्यक्तीचे नाव असून तो मेरठमधला रहिवासी आहे. या चित्रपटात अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ देखील दिसणाऱ आहेत. या चित्रपटात अनुष्का सेरेब्रल पाल्सी हा आजाऱ झालेल्या महिलेची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट येत्या 21 डिसेंबरला रिलीज होणार आहे.
Meerut se nikla hai, atrangi iski chaal hai,
Koi chhoti cheez na samajhna, yeh Bauua toh Bawaal hai!#PictureNahiFeelingHai#ZeroTrailer @anushkasharma #KatrinaKaif @aanandlrai @RedChilliesEnt @cypplOfficialhttps://t.co/l0QUPvvybX— Shah Rukh Khan (@iamsrk) November 2, 2018




























































